¡Sorpréndeme!

Special Reports On Eknath Shinde Ajit Pawar | शिंदे, अजित पवारांच्या नाराजीची चर्चा का रंगली?

2025-04-14 1 Dailymotion

Special Reports On Eknath Shinde Ajit Pawar | शिंदे, अजित पवारांच्या नाराजीची चर्चा का रंगली? 
महायुती सत्तेत आल्यापासून 'नाराजी' हा शब्द अनेक वेळा चर्चेत आला. मग ती नाराजी शपथविधीवेळची असो, मंत्रिमंडळ विस्तारावेळची असो किंवा मग अन्य कोणत्या तरी कारणामुळे... आणि या सगळ्या नाराजीनाट्याच्या केंद्रस्थानी राहिलेले दोन महत्वाचे चेहरे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार... दोघेही उपमुख्यमंत्री... आणि याच उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीचा मुद्दा आज पुन्हा एकदा रंगला.... पण तो कोणत्या कारणामुळे? जाणून घेऊयात राजकीय शोलेचा हा आजचा पहिला रिपोर्ट....
महायुतीची सत्ता आल्यापासून गेल्या ५ महिन्यात   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा झाली नाही  असा एकही महिना गेला नाही....  सोमवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनी  चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमातही नेमकं तेच घडलं.... 
चैत्यभूमीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण झालं  मात्र या कार्यक्रमात शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही  बोलण्याची संधी मिळाली नाही  नेमकं काय घडलं यावर एक नजर टाकूयात....